पंढरपूर ( प्रतिनिधी) रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी पंढरपूर येथील शिवतीर्थावर माढा लोकसभा मतदारसंघातील त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रंजीत सिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. अशी माहिती मनसेचे महाराष्ट्राचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज रोजी सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या विकास कामाची त्याचप्रमाणे त्यांनी जाहीरनामांमध्ये दिलेल्या अभिवचनाची पूर्तता राम मंदिर उभारणी, त्याचप्रमाणे 370 कलम आणि मुस्लिम महिलांना जाचक असलेला तीन तलाक याविषयीचा योग्य तो निर्णय घेऊन कल्याणकारी काम केल्याच्या प्रित्यर्थ राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी अभिवचन दिलेले आहे.
उद्या पंढरपूर येथे होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केलेले आहे. या सभेसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी पंढरपूर येथील शिवतीर्थावर यावे. असे आव्हान मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
यावेळी उपस्थित पंढरपूर शहर मनसे अध्यक्ष संतोष कवडे त्याचप्रमाणे मनसे नेते शशिकांत पाटील, मोहम्मद वस्ताद हे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments