मोहोळ प्रतिनिधी --
सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. भाजपचे राम सातपुते व काँग्रेसच्या प्रणिती शिंदे हे दोन मतदारसंघ पिंजून काढत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे लोकसभेच्या निवडणुकीचे वारे सुरू असतानाच मोहोळ विधानसभा मतदारसंघात मात्र येणाऱ्या विधानसभेची तयारी अनेक इच्छुक उमेदवारांकडून सुरू असून त्यामध्ये मोहोळ विधानसभा मतदार
संघाच्या निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा माजी आमदार रमेश कदम यांनी कमबॅक केले आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा त्यासाठी रविवार, २८ एप्रिल रोजी त्यांनी मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर सायंकाळी चार वाजता जाहीर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये ते कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. त्यांच्याकडे असलेली कार्यकर्त्यांची फळी व त्यांच्या मागे असलेली मतदानाची पेटी नेमकी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे की भाजपच्या राम सातपुते यांच्या पारड्यात पडणार हे मात्र येणाऱ्या रविवारी स्पष्ट होणारआहे. सध्या तरी त्यांच्या या मेळाव्याकडे सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0 Comments