प्रतिनिधी :- अमर कांबळे
पंढरपूर तीर्थ क्षेत्र महराष्ट्र राज्यात सध्या खुपचं आघाडीवर अडलेले दिसून येत आहे, प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी निमित्त 10-11-लाख भाविक भक्त पंढरपूरची पाय वाट धरतात, व आपले मनातील नवस फेडून टाकतात, पंढरपूरची वाट धरताच मनामध्ये प्रसन्न तेचे वातावरण पसरते कारण पंढरी नगरीला काशीची उपनगरीं म्हणून संबोधले जाते, त्यामुळे पंढरी नगरीं मध्ये मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी त्या दिवशी दर्शन घेण्यासाठी 10-11-लाख भाविक भक्त पाय लावतात व तसेच चंद्रभागेच्या तिरावर्ती घाटाच्या स्वरूपात वसलेले पंढरपूर इस्कॉन मंदिर सध्या सर्व बाबतीत प्रसिद्ध झाले आहे, त्यामुळे या मंदिराची सर्व ठिकाणी चर्चा पाहता, या मंदिरातील भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी स्वदेशातील तसेच प्रदेशातून भक्त येत आहेत, व तसे पाहता हल्ली या मंदिराकडे प्रदेशातील भक्तांचा कल जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे, त्यामुळे पंढरी नगरींतील नागरिकांना त्यागोष्टीचे कौतुक वाटताना दिसून येत आहे, पंढरपूर इस्कॉन मंदिरामध्ये सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्याकारणामुळे प्रदेशातील भाविक भक्त खुश होऊन जातात, व पंढरपूरातील मंदिरातील परिसराला मनाचा (A)शेरा देऊन जातात अशी सर्व ठिकाणी चर्चा पाहवयास मिळत आहे.
Post a Comment
0 Comments