कोळगावच्या मतदारांनी केला मतदानावर बहिष्कार*
*नागरिकांनी एक ही मतदान केले नाही.
मुखेड तालुक्यातील मौजे कोळगाव येथून शहराला जोडणाऱ्या रस्त्याची वारंवार मागणी करूनही हा रस्ता मंजूर होत नसल्याने येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालत असल्याचे कल्पना दिली होती याबद्दल प्रशासनाने गावकऱ्यांना समजूत घालीत रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन दिले होते तरीपण सदरील गावातील मतदारांनी होत असलेल्या दि. २६ एप्रिल रोजीच्या मतदान केंद्राकडे एकही मतदाराने मतदान करण्यासाठी फिरकले नसल्याने येथील मतदान भूत केंद्रावर एकही मतदान झाले नसल्याची माहिती सरपंच प्र. शिवाजी पाटील यांनी दिली.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होऊनही मौ. कोळगांव गावापासून डांबरीकरणाचा पक्का रस्ता मंडलापूर फाटा ते कोळगांव व कोळगाव ते हंगरगा होण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी यांना तर १८ फेब्रुवारी २०२० रोजी व दि. २ जुलै २०२१ रोजी तहसीलदार यांना तर दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी उपअभियंता यांना, दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी कार्यकारी अभियंता ग्राम सडक योजना नांदेड यांना तर दि. १९ जानेवारी २०२४ रोजी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिलेला लेखी अर्ज करूनही आज लगत गावापासून शहराला जोडणाऱ्या रस्त्याचे काम झाले नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर नाराज गावकऱ्यांनी ही भूमिका घेतली.
दरम्यान लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालताच प्रशासन संबंधित गावकऱ्यांना भेटून बहिष्कार मागे घेण्यासाठी व सदरील रस्ता काही दिवसात पूर्ण करून देतो म्हणून समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाला गावकऱ्यांनी न मानता हा निर्णय कायम ठेवला असल्याने २६ एप्रिल रोजीच्या मतदानाच्या दिवशीही सहायक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी गावात जाऊन येथील नागरिकांना मतदान करण्याचे आव्हान केले होते तरीपण सदरील गावच्या मतदाराने मतदान करण्याठी मतदान केंद्राकडे फिरकलेच नसल्याने या बूथ केंद्रावर एकही मतदान झाले नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
Post a Comment
0 Comments