*("आमचं ठरलय" म्हणत बाळदादांनी अखेर फुंकली तुतारी)*
*(सोलापूर, बारामती व माढा मतदार संघात महायुतीला मोठा फटका बसणार:- जयसिंह मोहिते पाटील)*
*(निर्णय होताच डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली मोहिते-पाटील कुटुंबाची यांची भेट)*
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढतील. माढा सोलापूर आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही असा दावा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू तथा सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी अकलूजमध्ये केला.
माढ्याचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबीयांनी विरोध केला होता. भाजपा आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक बुधवारी सकाळी अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर आले होते. मोहिते पाटील आणि परिचारक यांच्यात बऱ्याच वेळ चर्चा झाली. या दरम्यान शिवरत्न बंगल्यावर जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हजर होते. जयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांची संवाद साधला. जयसिंह म्हणाले, राजकारणात काही निर्णय घेताना वाट बघावी लागते. माढा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही. केवळ माढाच नाही तर बारामती सोलापूर मतदारसंघातून ही भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत माण, करमाळा, माढा विधानसभा मतदारसंघात ही भाजपाला यश मिळणार नाही. दरम्यान जयसिंह आणि मोहिते पाटील कुटुंबीयांनी धैर्यशील मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात लवकरच प्रवेश करतील असे संकेत दिले.
*चौकट*
*आम्ही सर्व मोहिते पाटील कुटुंबांनी आता माढा मतदारसंघात बदल घडवायचा असे ठरवले असून भाजपा विरोधी आघाडी तयार करून माढा लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार हा धैर्यशील मोहिते पाटील असेल, आमच्या सोबत यायला बरेच जण तयार झाले असून मतदारसंघात आमच्या बाजूने वातावरण "पॉझिटिव्ह" आहे*.
Post a Comment
0 Comments