Type Here to Get Search Results !

*जीवनाशी समर्थपणे झुंज देणाऱ्या आदर्श महिलांचा सन्मान समाजसेवक कमलीवाले यांचा महिलादिनी उपक्रम*




पंढरपूर (प्रतिनिधी)


समाजात पुरुषांबरोबर महिलाही खांद्याला खांदा लावून काम करू लागले आहेत. महिला सबलीकरणाच्या योजना सरकार राबवू लागले आहे. महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो. यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांची प्रसिद्धीही केली जाते. यास फाटा देऊन, समाजसेवक कमलीवाले यांनी जीवनाशी दोन हात करणाऱ्या महिलांचा सन्मान करून, समाजास वेगळी दिशा दाखवून दिली आहे.



जीवन गाणे ... गातच राहावे ! या गीताची आठवण करून देणाऱ्या

महिलांच्या जिद्दीला कमलीवाले यांनी महिला दिनी सन्मानित केले आहे. पंढरपूर शहरातील संत गजानन महाराज मठासमोर या दोन्ही महिला

चप्पल आणि बूट पॉलिशचे काम करून चरीतार्थ चालवत आहेत. यातील एक महिला अपंग असूनही, जिद्दीने हा व्यवसाय करीत आहे. या महिला समाजात नेहमीच उपेक्षित राहिल्या आहेत.

हे समाजसेवक मुजमिल कमलीवाले यांच्या नजरेतून

हुकले नाही. त्यांनी या दोन्ही महिलांची महिलादिनी भेट घेतली. त्यांना साडी चोरीचा आहेर केला. गुलाबपुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कमलीवाले हे नेहमीच उपेक्षितांना न्याय देण्यासाठी आग्रही राहिले आहेत. मोठ्या महापुरुषांच्या जयंत्याही त्यांनी उपेक्षित ,अनाथ बालकांसोबत केल्या आहेत. त्यांनी केलेल्या या महिलांच्या सन्मानामुळे कमलीवाले यांच्याविषयी समाजात आदराची भावना राहणार आहे.

Post a Comment

0 Comments