प्रतिनिधी -अमर कांबळे
पंढरपूर तालुक्यातील प्रगतीलशील गाव म्हणून कोर्टी गावाची गणना केली जाते, या गावात सतत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, तसेच त्याचे अवचित साधून महाशिवरात्री निमित्त कोर्टी गावातील विद्यमान सरपंच राजू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात घेण्यात आलेल्या तपासण्या अस्थीरोग, त्वचारोग, बालरोग, हृदयरोग,स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, तपासणी करण्यात आली, यावेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन लाभले, डॉ ओंकार पावले, डॉ वृषभ फडे, डॉ अमित मेनकुदळे, डॉ ओजस देवकते, डॉ स्नेहा रोंगे, डॉ रेश्मा कारंडे, डॉ विजयालक्ष्मी हिरवे, या सर्व डाक्टरांचे बहुमोल्य मार्गदर्शन लाभले, यावेळी कोर्टी गावातलील सर्व जेष्ठ मंडळी व समाजकर्ते उपस्थित होते, व या कार्यक्रमासाठी सर्वानी सहकार्य केले व विद्यमान सरपंच राजू पवार यांनी हे उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे व पुढील कार्यास शुभेच्या भेटत आहेत या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार यांचे बहुमोल्य सहकार्य लाभले.
Post a Comment
0 Comments