प्रतिनिधी अमर कांबळे
*पंढरपूर तीर्थ क्षेत्र हे सध्या काशी म्हणून सर्व ठिकाणी ओळखले जाते, पंढरपूर काशिमध्ये दिवसाला लाखो भाविक भक्त पंढरपूर शहरामध्ये आगमन करत असतात, व पंढरी नगरीला पाय लागला म्हणून समाधानी होऊन जातात, पंढरी नगरीं मध्ये पाय ठेवण्यासाठी काही भाविक भक्त कित्येक वर्षे तरी मनामध्ये तपचार्य करत असतात, एखदातरी पंढरपूर नगरीं मध्ये पाय देऊन यावे म्हणून, कित्येक तरी भक्त हजारो किलोमीटरचे अंतर पार करून देवदर्शनाला येतात, हजारो किलोमीटरचे अंतर कापून आल्यानंतर पंढरपूर शहरामध्ये जेवढे प्रसिद्ध ठिकाण आहेत त्या ठिकाणी भेट देऊन नतमस्तक होऊन येतात, व आपल्या मनाला समाधान लाभवून घेतात, हजारो किलोमीटरचा प्रवास करून विश्रनतीसाठी एखादे शांत ठिकाण शोधतात, सध्या चंद्रभागा नदीकाठी वसलेले इस्कॉन मंदिर सर्वच बाबतीत प्रसिद्ध झालेले दिसून येत आहे, त्यामुळे नवीन भाविक भक्त इतर भक्तांच्या तोंडून ऐकल्यानंतर एइ इस्कॉनची वाट धरतात, व इस्कॉन भक्त निवास मध्ये राहण्याची सोय करतात, इस्कॉन मध्ये सर्व भाविक भक्तांची योग्य पद्धतीची योग्य सोय केली जाते, व भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान लाभेल अशी सेवा दिली जाते, त्यामुळे सध्या स्थिती पाहता, पंढरपूर इस्कॉनचे भाविक भक्तांकडून कौतुक होताना चर्चेच्या माध्यमातून दिसून येत आहे*
Post a Comment
0 Comments