Type Here to Get Search Results !

उत्पात समाजाच्या लावणी महोत्सवास शासकीय अनुदान मिळावे, लावणीचे अध्यासन केंद्र विद्यापीठात स्थापन करण्यात यावे. उत्पात मंडळींची पत्रकार परिषदेत मागणी.

 


प्रतिनिधि पंढरपूर -

मागील गेल्या १५०वर्षांपासूनच पंढरपूर येथील श्री रुक्मिणी देवीचे पारंपरिक पुजारी होळी ते रंगपंचमी या काळात उत्तर पेशवाई काळातील बैठकीच्या लावण्या सादर करीत आहेत.

या लावणी महोत्सवाला शासकीय अनुदान मिळावे राज्याच्या सांस्कृतिक खात्याने याची दखल घेऊन हा वारसा जतन करावा, 

अशी मागणी उत्पत समाजातील सुप्रसिध्द लावणी गायकांनी केली.

शनिवार दिनांक २३मार्च रोजी येथिल एकनाथ भवन येथे खास पत्रकार परिषद य मागणीसाठी आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी उत्पात समाजातील ज्येष्ठ लावणी गायक मनोहर उर्फ छबुराव उत्पात, श्याम उर्फ विनय उत्पात, हेमंत उत्पात, अनिल उत्पात, प्रसाद उत्पात,उत्पात समाजाचे अध्यक्ष अतुल उत्पात, वादक रवींद्र वनारे, भोलानाथ भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रमाणेच राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये दिवंगत लावणी सम्राट ज्ञानेश्वर विठ्ठल उत्पात (ज्ञानोबा उत्पात) यांच्या नावाने लोककला अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

छबुराव उत्पात म्हणाले, लावणी म्हणजे मराठी शारदेच्या पायातील चाळ आहेत . बैठकीच्या लावणीची परंपरा १५०वर्षांपासून उत्पात समाजाने जपली आहे.

  स्व दादबा उत्पात, स्व. ज्ञानेश्वर गोपाळ उत्पात,

यांच्या नंतर ज्ञानोबा उत्पात, वा.भ उत्पात, बी डी उत्पात यांनी हा छंद जोपासला व उत्पात गल्लीतील लावणी दिल्ली पर्यंत गाजविली, ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे यांची दाद मिळाली, दुर्गा भागवत, पंडित भीमसेन जोशी, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, बाबूजी यासारख्या दिग्गजांनी ज्ञानोबा ऊत्पात

यांच्या लावणी गायनाला भरभरून प्रतिसाद दिला.

 कुमार गंधर्व तर म्हणाले, उत्पात ही लावणी नाही तर भुलावणी आहे.

अशा या उत्पात समजाच्या लावणी ची होळी ते रंगपंचमी परंपरा आजही कायम आहे.

यामुळे या कलेस राजाश्रय लाभल्यास ही कला अजूनही बहरेल राज्य सरकारने याचा विचार करून शासकीय अनुदान व अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये लोककला अध्यासन केंद्र, सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकट

रविवार दिनांक २४ते रविवार दि.३०मार्च या काळात म्हणजेच होळी ते रंगपंचमी या पाच दिवसात जुनी माळी गल्ली येथील एकनाथ भवन मध्ये रात्री साडे आठ ते साडे दहा पर्यन्त बैठकीच्या लावण्या सादर होणार असुन मंगळवार दिनांक २६रोजी मोडनिंब येथील सुप्रसिध्द नृत्यांगना नंदा उमा इस्लामपूरकर, नंदा प्रमिला लोदगीकर,, सुनीता वानवड कर यांच्या नटरंग कलाकेंद्र

मधील नृत्यांगना रसिकांसमोर आपली कला सादर करणार आहेत.

Post a Comment

0 Comments