प्रतिनिधी
राज्यात झालेल्या पक्ष फुटीच्या राजकीय स्थित्यंतरानंतर शरद पवार गट अद्याप ही सावरला नसला तरी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय खलबत्ते पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांच्यात पुन्हा एकदा भेट झाली असून यामागे मोठी राजकीय खलबद होण्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादीसोबत जनशक्ती संघटना जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची अतुल खूपसे पाटील आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यापूर्वी देखील राष्ट्रवादी व जनशक्ती संघटना एकत्रित काम करणार या विषयावर भेटी झाल्या होत्या. मात्र आज पुन्हा एकदा याच विषयावर भेट झाली व शरद पवार यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेसोबत येण्याचे प्रस्ताव तयार करून द्या अशी विनंती अतुल खूपसे पाटील यांना केली असून येत्या दोन दिवसात जनशक्तीचे अतुल खुपसे पाटील हे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जनशक्ती संघटना ही गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रभर काम करत असून वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी शासन आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जनशक्तीची महाराष्ट्रभर चळवळ उभी करून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. याची दखल घेऊन दस्तूर खुद्द शरद पवार यांनी राष्ट्रवादीसोबत येण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगण्यात येते.
Post a Comment
0 Comments