Type Here to Get Search Results !

शेगाव दुमाला येथे एक लाखाची गोव्याची दारू जप्त* पंढरपूर विभागाची कारवाई






राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने गुरुवारी शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथून एक लाख आठ हजाराची गोव्याची दारु जप्त केली. 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध छापे टाकण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता बालाजी विश्वनाथ चवरे, वय 29 वर्षे, रा. पेनुर ता.मोहोळ व आकाश राजकुमार बनसोडे, वय 24 वर्षे, राहणार बेंद वस्ती कासेगाव, ता. पंढरपूर हे दोघेही त्यांच्या मोटरसायकलींवर प्लास्टिक पोत्यात गोवा राज्यात विक्रीस असलेली व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकली, 750 मिली क्षमतेच्या रॉयल क्लासिक व्हिस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या 60 बाटल्या, एक मोबाईल असा एकूण एक लाख 76 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पंढरपूर यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पुढील तपासात आरोपींची कसून चोकशी केली असता त्यांनी गोवा राज्य निर्मित विदेशी दारुचा साठा एका अज्ञात स्थळी ठेवल्याचे सांगितल्यावरुन तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांनी कासेगावच्या हद्दीतील सरकारी कॅनलच्या पश्चिमेस काटेरी झुडपात पोत्यांमध्ये लपवून ठेवलेल्या 750 मिली क्षमतेच्या रॉयल क्लासिक व्हिस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या 120 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एक लाख आठ हजार किंमतीची गोवा दारु, 2 मोटरसायकली, एक मोबाईल, प्लास्टीक बुचे इ. असा एकूण दोन लाख अट्ठेचाळीस हजार सहाशे किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई अधीक्षक नितिन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार , दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, जवान प्रकाश सावंत, विजयकुमार शेळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.


*आवाहन*

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कर्नाटक राज्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आचारसंहिता कालावधी दरम्यान अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी विशेष सहा पथके नेमण्यात आली असून एक शीघ्र कृती दलही नेमण्यात आला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments