प्रतिधीनी-पंढरपूर..
राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम गेले अनेक वर्ष थांबले होते.पंढरपूर नगरपालिकेने गेल्यावर्षात हाती घेतले होते.व हे काम लवकरात लवकर पूर्ण करने अपेक्षित होते.पण अद्याप हि हे काम अपुऱ्या अवस्थेत पडलेले होती.राष्ट्रमाता जिजाऊ जयंती काही दिवसांवर येऊन पोहोचली होती व जिजाऊ स्मारकाची अवस्था खूपच खराब झाले होती. अनेक जिजाऊ भक्तांनी पंढरपूर नगरपरिषद यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.त्यावेळी आमदार साहेब यांच्याकडेही जिजाऊ भक्तांनी नाराजी व्यक्त केली होती.आणि मागणी केली की,जिजाऊ माँसाहेब यांचे स्मारकांचे शुभोभिकरण करण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली होती.पंढरपूर नगरपालिकेला या सर्व रखडलेल्या कामाची त्वरित पूर्तता करून घेण्यास बजावून सांगितले.त्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी पंढरपूर शहरातील सर्व सामाजिक संघटनेची बैठक घेऊन जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मारकांचे आराखड्या बाबत चर्चा करून आमदार समाधान दादा आवताडे,पंढरपूर शहरामध्ये जिजाऊ स्मारक होण्यासाठी आमदार समाधान दादा आवताडे यांनी एक कोटी रुपये निधी मंजूर करून दिला.त्याचप्रमाणे डीपीडीसी मधून अजून जो लागेल तो निधी देण्याचे आमदार साहेबांनी सांगितले आहे.आमदार समाधान दादा आवताडे यांनी जिजाऊ स्मारका बरोबरच भव्य आणि दिव्य अशी जिजाऊ सृष्टी सुद्धा उभी करावी.
अशी मागणी पंढरपूर शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी तसेच मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील यांनी आमदार समाधान दादा अवताडे यांच्याकडे केली होती.एक कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार समाधान दादा आवताडे यांचे शिवस्वराज्य युवा संघटनेकडून अभिनंदन अभिनंदन म्हणून 14 मार्च राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्मारकांचे भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे.त्याबद्दल पंढरपूर शहरातील सर्व सामाजिक संघटनेकडून आणि पंढरपूर शहरवासी यांच्याकडूनही आमदार समाधान दादा आवताडे यांच्यावर शुभेछाचा वर्षाव होत.अशी माहिती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी दिली.
Post a Comment
0 Comments